पुन्हा एकदा
आज वाटते पुन्हा एकदा बालपण यावे पांदीमधल्या वाटेवरूनी शाळेकडे जावे ।।१।। पाेतडी पिशवी बाई कन्हायची सदा पाठी चढण चढता कसरत हाेई आेढ्याकाठी ।।२।। जांभुळीची जांभुळे खिशात भरूनिया घ्यावी कधी ताेडुनी कारे,बाेरे गुरूजीसाठी न्यावी ।।३।। भुईमुंग,मुग आेल्या शेंगा वारवा माईचा शिकवा माझ्या पाेराला संदेश तिचा घाईचा ।।४।। घंटा घण घण पहिली स्वच्छतेला लागावे
