Blog

अगोदरच का नाही भेटलास?

सुषमा माहेरी पुण्यात आली होती. पेपरमध्ये माझे लेख वाचून मला आवर्जून भेटायला आली होती सासू, नणंद व नवऱ्याकडून वारंवार होणारा अपमान, पाणउतारा यामुळे ती स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसली होती. स्वतःला अबला म्हणवून घेत होती. न्यूनगंडाने ग्रस्त होती. मी तिला पूर्णतः बोलून दिले. थोडी मोकळी व शांत झाल्यानंतर मी तिला म्हटले. सुषमा स्त्री ही किंगमेकर असते.

अगोदरच का नाही भेटलास? Read More »

मध्यम मार्ग

जेव्हा एअर कंडीशनर आले तेव्हा हेन्री फोर्डने घर -पोर्च ऑफिस-कार -सगळेच एअर कंडीशनींग केले त्यामुळे अल्पावधीतच तब्येतीच्या कटकटी सुरू झाल्यावर त्याला डॉक्टरांकडे जावे लागले. डॉक्टरांनी हेन्रीला सकाळी व संध्याकाळी एक एक तास गरम पाण्याच्या टबमध्ये पडून राहण्यास सांगितले त्यामुळे शरीरातून भरपूर घाम निघून हेन्रीचे स्वास्थ्य चांगले झाले हेन्नीच्या लक्षात आले की, दिवसभर आपण घाम पूर्णतः

मध्यम मार्ग Read More »

सकारात्मक दृष्टीकोन हवा !

  सारा निसर्गसंसार हा मानवी मनाचाच खेळ आहे. म्हणून तर म्हणतात, “मन चिंती ते वैरी न चिंती।” मनातील चिंतनावरच आपली उर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून उन्नत जीवनासाठी मनाला सकारात्मक विचारांच्या आहाराची गरज असते. नकारात्मक विचार माणसाला दुर्बल बनवतात. म्हणून ब्रिटीश म्हणाले होते, भारतीयांच्या विचारांना मारून टाका म्हणजे ते मरतील राजा हर्षवर्धनाची अंगठी, सैनिकांसमोर चिखलात

सकारात्मक दृष्टीकोन हवा ! Read More »

खेळ कुणाला दैवाचा कळला ?

केदारचे वडील व्यवसायाने नामांकित डॉक्टर- प्रतिष्ठा- ऐश्वर्य सर्व काही मुबलक. केदार हा एकुलता एक सुशिक्षीत मुलगा. आई-वडिलांनी उत्तम संस्कार केलेले पण केदारच्या मनात वडिलांबदद्ल तीव्र द्वेष तो वारंवार काहीही कारणे काढून वडिलांबरोबर भांडणे करायचा वेळप्रसंगी वडिलांना शिवीगाळही करायचा वडिलांबदद्ल मित्रांशी बोलताना अपशब्द वापरायचा. वडील म्हणून त्यांची सर्व कर्तव्ये पूर्ण करत असून देखील केदार असे का

खेळ कुणाला दैवाचा कळला ? Read More »

सर मला झोपच येत नाही

झोपायची वेळ रेडिओवर एक गाणं लागलं होतं. “लिबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही”. मला केतनची आठवण झाली. केतनला झोपच व्यवस्थित येत नव्हती म्हणून खूप नैराश्य आले होते. रात्रभर तो काळजी करत व्याकुळ व्हायचा त्यामुळे त्याच्या जीवनावर या गोष्टीचा खूप गंभीर परिणाम झाला होता. मी त्याला म्हणालो केतन

सर मला झोपच येत नाही Read More »

व्हा अनासक्त

तानाजी खूप कष्टाळू, हुशार, नितीमान कर्मचारी, कारखान्यात लोक त्यांचा खूप आदर करत. शासनाने गुणवंत कामगार पुरस्काराने त्याला गौरवले होते आदर्श कुटूंब म्हणून नात्यात त्याला मोठा मान होता. अशातच तानाजीचा एकुलता एक मुलगा चोऱ्या करू लागला. घरफोडी, लूटमार यासारख्या अनेक गुन्हयात वर्तमानपत्रात त्याचे नाव झळकू लागले पोलिसांकडून कुटूंबाला वारंवार त्रास होऊ लागला. या सगळ्या बदनामीने तानाजी

व्हा अनासक्त Read More »

ए भाय जरा देख के चलो

  ५ दिवसाचा आठवडा -खूप काम, व्यस्त जीवनशैली. मग दोन-तीन दिवस का होईना सुट्टी मिळाली की, मित्र मैत्रीणों विशेषत बाहेरगावाहून नोकरीनिमित्त इतरत्र राहणारी बॅचलर्स किंवा कुटुंब आराखडा आखतात दोन दिवस सहलीला जाण्याचा स्थळ, वेळ, पक्की होते काही जण स्वतःचीच गाडी (दुचाकी किंवा चारचाकी) काढतात, जातानाच मद्य प्राशनाला सुरुवात, त्यातच बॅचलर्स असतील तर मग रिमिक्स गाणी

ए भाय जरा देख के चलो Read More »

मोबाईल

  रविवारचा दिवस केशकर्तनालयात गेला होतो तेथे रेडिओवर एक गाणे लागलेले होते. मेरे पिया गये रंगून वहाँ से किया है। टेलिफोन-तुम्हारी याद सताती है। बाजूला पाहिले तर प्रतिक्षेत असलले तीन- चार जण मोबाईलमध्ये गुंग झाल्याचे दिसले. परवाच सागर पावसात भिजत कामावर आला पण मोबाईल मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीत मागच्या खिशात असा ठेवून दिला होता, की पाण्याचा

मोबाईल Read More »

पैसा

  सुदामरावाची २० एकर बागायती शेती दोन मुले, दोन मुली वडीलोपार्जित बाडा, गाई-म्हशी, नोकरचाकर सुदामरावाने कष्ट करून चारही मुलांना उच्चशिक्षण देण्याचा पूर्णतः प्रयत्न केला. एक मुलगा उच्चशिक्षण घेऊन पुण्यात स्थायिक झाला व त्याने स्वतःचा कारखाना उभा केला. धाकटा मात्र बौध्दिक कुवत कमी असल्याने फारसे शिक्षण घेऊ न शकल्याने शेतीच करू लागला दोन्ही मुलीची सुदामरावाने थाटामाटात

पैसा Read More »

जुळवुन घ्या

  हेकेखोर स्वभाव व जुळवून घेणे जमत नसल्याने केदार कुठल्याही नोकरीत स्थिर होत नव्हता. सासऱ्यांच्या ओळखीने त्याला नामांकित कारखान्यात नोकरी लागली होती. ती पण त्याला टिकवता आली नाही. या गोष्टीचा त्याच्या मनावर परिणाम होऊन तो नैराश्यात गेला. तीव्रता इतकी वाढली कि तो आक्रमक होऊन घरात वस्तू फेकणे, मारहाण करणे ईथपर्यंत त्याची मजल गेली. त्याची पत्नी

जुळवुन घ्या Read More »

error: Content is protected !!