एक मिस कॉल द्या
रांजणगाव भागामध्ये माझ्या ‘मनाची अमर्याद शक्ती’ या कार्यशाळेमध्ये मी श्रोत्यांना म्हणालो, ‘मित्रांनो, काही गैरसमजाने किंवा आपल्या अहंकारामुळे जर एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली असेल तर, त्या व्यक्तीला शांतपणे डोळे मिटून डोळ्यासमोर आणा व त्याच्याविषयी चांगल्या भावनेने मंगलमैत्रीचा अभ्यास करा. त्या व्यक्तीला एक मिस कॉल द्या.’ त्या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये त्याच्या मुलाबरोबर वडिलांची थोडी कुरबुर
