विचारधन…

आयुष्य गंभीर होऊन जगू नका

जीवनात तसेच करिअरमध्ये केवळ शैक्षणिक किंवा करिअरविषयक ध्येय उराशी बाळगू नका. सारे जीवन सुंदर, समतोल व्यतीत करण्याच्या दृष्टीने आपले लक्ष्य व ध्येय निश्चित करा. म्हणजेच तुमचे आरोग्य, नाते संबंध, मानसिक स्वास्थ्य सारे सारे उत्तम राहील अशा दृष्टीने जीवनाची बांधणी करा. तसेच बनण्याचा प्रयत्न करा. तरच आयुष्याला खरा अर्थ आहे असे मी म्हणेन. ज्या दिवशी तुम्हाला

आयुष्य गंभीर होऊन जगू नका Read More »

“साध्या जीवनाची समृद्धी आणि आजच वेगवान जग”

  साधारण चाळीस वर्षं मागे जाऊन पाहू. स्वयंपाकघरात यंत्र नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट करण्यासाठी खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणच, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वतः लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. 🥘✨  

“साध्या जीवनाची समृद्धी आणि आजच वेगवान जग” Read More »

वाचनाच्या प्रत्येक पानावर भावना

वाचन ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला फक्त माहिती देत नाही, तर आपल्याला विविध भावना, विचार आणि अनुभव देखील देऊन जाते. प्रत्येक पुस्तक, प्रत्येक कादंबरी किंवा कथा वाचताना त्याच्या पानांवर एक वेगळी भावना उमठते. आपण कधी हसतो, कधी रडतो, आणि कधी शांततेचा अनुभव घेतो. साहित्याच्या शब्दांमध्ये अनेक प्रकारच्या भावनांचा समावेश असतो, ज्यामुळे वाचन एक

वाचनाच्या प्रत्येक पानावर भावना Read More »

‘अर्थात’ वाचणं म्हणजे अ‌द्भुत आनंद

मी अच्युत गोडबोले सरांची अनेक पुस्तकं वाचली. अगदी सध्याच वाचलं ते म्हणजे ‘अर्थात.’ गोडबोलेंच्या लिखाणाची शैली खूपच रंजक असते. जे जे त्यांना वाचतात ते ते सगळेच मान्य करतील. पुस्तक वाचायला सुरुवात करण्याआधी, त्यांचं लिहिलेलं ‘प्रास्ताविक’ वाचणं म्हणजे पर्वणीच वाटते. त्यांचं प्रास्ताविक म्हणजे त्यांच्या मनाचा आरसाच असतो. ‘अर्थात’ हा अर्थ म्हणजे पैसा… पैशाचं शास्त्र. खरंतर अत्यंत

‘अर्थात’ वाचणं म्हणजे अ‌द्भुत आनंद Read More »

अलेक्झांडर द ग्रेटच्या शेवटच्या 3 ईच्छा

एका प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, अलेक्झांडर द ग्रेटने, मृत्युशय्येवर असताना, आपल्या सेनापतींना एकत्र केले आणि आपल्या तीन अंतिम इच्छा त्यांना सांगितल्या. त्या अशा होत्याः   1) जगातील सर्वोत्तम डॉक्टरांनीच त्याची शवपेटी उचलावी.   2) त्याने आयुष्यभर जमा केलेली अफाट आर्थिक संपत्ती (सोने, मौल्यवान हिरे-माणकं, दागिने) त्याच्या अंत्ययात्रेमध्ये उधळावी.   3) जे लोक त्याच्या अंत्ययात्रेत सामील होतील त्यांना

अलेक्झांडर द ग्रेटच्या शेवटच्या 3 ईच्छा Read More »

। भगवान श्रीकृष्ण ।

  भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर झाला आहे. भगवान श्रीकृष्णानी ज्या दिवशी अवतार घेतला त्या दिवसाला जन्माष्टमी म्हणतात.   त्यामुळे कृष्णजयतीच्या वेळी रात्री १२ वाजता अष्टमी असणे आवश्यक आहे. तेव्हा रोहिणी नक्षत्रही असेल तर फारच उत्तम पण रोहिणी नक्षत्र असण्याची जरुरी नाही.   भगवान श्रीकृष्णांनी श्रावण महिन्यामध्ये जन्म घेऊन श्रावण महिन्याला

। भगवान श्रीकृष्ण । Read More »

।। सूर्यकिरणांचे महत्त्व ।।

  सूर्यकिरणांत किती अमाप शक्ती असते याची आपल्याला कल्पनाही नसते. कोणत्याही ऋतूमध्ये सकाळची उन्हे उघड्या अंगावर घ्यावीत. सूर्यकिरणे शरीरात जावी इतका वेळ उन्हात बसावे. सूर्यकिरणांमुळे शरीराची कांती वाढते. सूर्यकिरण स्नानाने त्वचारोग, पंडुरोग व अनेक असाध्य रोग बरे होण्यास मदत होते. आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अर्घ्य देण्याची जी पद्धत शोधून काढली ती यासाठीच. धर्माबरोबर आरोग्याचाही विचार केलेला

।। सूर्यकिरणांचे महत्त्व ।। Read More »

।। आहार व अध्यात्म ।।

मनुष्याचा पिंड अन्नमय आहे. शरीराला अन्नाचा पुरवठा करावाच लागतो, परंतु तो प्रमाणात असावा जेणे करून स्थूलपणा येणार नाही, सुस्ती व आळस येणार नाही. शरीरात उत्साह कायम राहील इतके अन्न घ्यावे. रोजचे सामान्य जीवन जगण्यासाठी जास्त आहाराची गरज नाही. कारण जास्त आहार घेतला की, नवीन विचार सुचत नाहीत. अति आहार घेणाऱ्यांना मनःशांती लाभत नाही. मन दुर्बल

।। आहार व अध्यात्म ।। Read More »

डिजिटल विश्राम घ्या

मी असे सुचवू का, तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि अधिक ताजेतवाने वाटण्यासाठी, तुम्ही आठवड्यातून कमीतकमी एक दिवस तरी टेक्नोलॉजी-मुक्त राहा?   याचा अर्थ पूर्ण चोवीस तास फोन नाही, सोशल मीडिया नाही, चॅट्स नाहीत आणि डिजिटल खरेदी नाही. प्रत्येक आठवड्याला.   फक्त जगण्यासाठी. तुमच्या आयुष्यातील मूलभूत आणि बऱ्याचदा संवेदनापूर्ण आनंद उपभोगण्यासाठी. वर्तमानात राहण्यासाठी (विखुरलेपणाने नाही) आणि मानसिक

डिजिटल विश्राम घ्या Read More »

।। व्यक्तिमत्त्व ।।

व्यक्तिमत्त्व हे फक्त सौम्य आचरणातून, वागण्यातून दिसते व विकास पावते असे नाही. काही व्यक्ती कडक आचरण, शुद्धता व शुचिर्भूतपणा पाळतात. अशा व्यक्तीचे बोलणे गोड, प्रासादिक व रसाळ असते व ते तासन्तास श्रवण करावेसे वाटते. उदा. श्रीशंकराचार्यांचे वागणे व बोलणे शुद्ध व पवित्र असते. प्रत्यक्ष भगवान शंकराचा वास त्यांच्यात आहे असे जाणवते. त्यांना पाहिले की, मनात

।। व्यक्तिमत्त्व ।। Read More »

error: Content is protected !!