सुखाचा पासवर्ड

जशी दृष्टी – तशी सृष्टी

इसाप अथेन्समधील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली निवांत बसलेला होता. तेव्हा एक वाटसरू त्याच्यासमोर थांबला व त्याने इसापला विचारले, “अहो महाशय, मला या गावात राहायला येण्याची इच्छा आहे. मला सांगा या गावातील माणसे कशी आहेत?” इसाप त्याला म्हणाला, “तू जिथून येथे रहायला येणार आहेस त्या ठिकाणची माणसे कशी होती?” हा प्रश्न ऐकताच तो वाटसरू म्हणाला,

जशी दृष्टी – तशी सृष्टी Read More »

आपली बलस्थाने ओळखा

जगात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची काही ना काही बलस्थाने असतात. आवाज, उंची, बुद्धी, कल्पनाशक्ती, अभिनय अशा अनेक गोष्टी आहेत, त्यांपैकी प्रत्येकाकडे काही ना काही असे विशेष असते. सर्वसाधारणपणे समाजात वावरताना किंवा अगदी कौटुंबिक पातळीवरदेखील आपल्यातील बलस्थानांपेक्षाही कमतरतांकडे अधिक लक्ष दिले जाते. काही वेळा तर लहानपणापासूनच बलस्थाने सांगण्याऐवजी मुलांना सातत्यान त्यांच्यातील कमी बाजू सांगितल्याने त्यांचा पार गोंधळ

आपली बलस्थाने ओळखा Read More »

किंमत

  प्रख्यात वक्त्याची ‘मनाची शक्ती’ या विषयावरची कार्यशाळा सुरू होती. वक्त्याने ५० रुपयांची करकरीत नोट खिश्यातून काढली. व त्याने श्रोत्यांना पहिला प्रश्न केला. सांगा ही ५० रुपयांची नोट कोणाला हवी आहे? पैसा तर प्रत्येकालाच हवा असतो. पण कोणीही हात वर केला नाही. कारण लोकांच्या मनात संभ्रम, शंका, भीती व हा काय देणार आहे का? असे

किंमत Read More »

अविद्या दुःखाचे कारण

  कोहिनूर हिरा हैदराबाद इवल्या गोवळकोंडा परिसरात सापडला होता. एक रत्नपारखी व्यक्ती काही कामानिमित्ताने गोवळकोंड्याला गेला होता. तिथल्या रस्त्यावरून जाताना त्याचे लक्ष रस्त्यावर खेळत असलेल्या मुलांकडे गेले ती मुले एका विशिष्ट लगोरीचा खेळ खेळत होती त्यामध्ये एक सपाट दगडाने काही अंतरावरील गोल दगडाला मारावयाचे असते. रत्नपारखीच तो, त्याचे लक्ष त्या मुलाच्या हातातील दगडाकडे गेले, त्याने

अविद्या दुःखाचे कारण Read More »

हजार आरश्यांची खोली

एका आध्यात्मिक गुरुंना एका माणसाने विचारले, “माझे कामगार माझ्याशी प्रामाणिक नाहीत. पत्नी, मुलं, सगळं जग हे स्वार्थी आहे सगळे चुकीचेच वागतात. अस का?” तेव्हा गुरू हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. एका गावात एक खोली होती. त्या खोलीत १००० आरसे होते. त्या खोलीत एक छोटी मुलगी खेळायला जायची. अर्थातच तिला तिच्या भोवती अनेक मुली दिसायच्या.

हजार आरश्यांची खोली Read More »

काय करून बसलो

  उच्चशिक्षित संजय एका मल्टिनॅशनल कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला लागला. संजय कामांमध्ये अत्यंत हुशार होता. त्यामुळे त्याला कारखान्यात मोठ्या प्रमाणात मानसन्मान होता. कमी दिवसांमध्ये बढती मिळणाऱ्या लोकांमध्ये तो एक होता. सुपरवायझर म्हणून रोल करताना त्या व्यक्तीला कामगारांकडून प्रॉडक्शन करून घेणे, व्यवस्थापनाची मागणी पूर्ण करणे, कामगार व कामगार युनियन यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवणे व स्वतःच्या करिअरमध्ये

काय करून बसलो Read More »

आपली किंमत

  किंमत ही गोष्ट सापेक्ष आहे, कारण प्रत्येक गोष्टीची किंमत ही पैशात करता येत नाही. आई आपल्या मुलाला जन्म देते, माया, प्रेम करते, त्याला वाढवते, त्याची किंमत पैशात नक्कीच करता येणार नाही. मात्र व्यक्तीने आपले मोल ओळखले पाहिजे हेदेखील खरे आहे. आपले योग्य मोल जाणून घेण्यासाठी काय करायला हवे तर सजग रहायला हवे. एक छान

आपली किंमत Read More »

सर त्याचं लफडं आहे!

  निसर्ग हा अफाट असतो, त्याच्या लीलेचे अगाध रूप म्हणजे माणूस. निसर्गाचे हे रूप अगदीच आगळेवेगळे आहे. निसर्गाच्या या लीलेची दोन उपरूपे म्हणजे स्त्री आणि पुरूष. या दोन्ही रूपांमध्ये फरक ही फार वेगवेगळा. तसेही मानवी मनाचे, वर्तणुकीचे अनेक प्रकार आपल्याला पहायला मिळतात. पण स्त्री आणि पुरूष ही दोन रसायने काही आगळी वेगळी आहेत. या दोन्ही

सर त्याचं लफडं आहे! Read More »

विश्वासघात… सावधान !

  एक प्रसिद्ध नाटक, नटसम्राट. जुने आहे पण नव्या स्वरूपात म्हणजे चित्रपट म्हणूनही साकार झाले आहे. बहुतेकांनी हा चित्रपट तर नक्कीच पाहिला असेल. त्यात पोटची मुलंच आईवडिलांशी कशा पद्धतीने वागतात ते पहायला मिळालं. एका उत्तम नटाने त्याच्या मुलांवर ठेवलेला विश्वास त्यांनी धुळीत मिळवत सारे पदरात पाडून घेतले त्याचे विदारक चित्र या नाटकातून पहायला मिळते. नाटक

विश्वासघात… सावधान ! Read More »

मानसिक हक्क

  मी नियमितपणे एका देवळात दर्शनासाठी जात असे. देवळाबाहेर एक भिकारी कायम मदतीसाठी याचना करताना भेटत असे. देवाच्या दारी आलेल्यांना कधी वाटले तर त्याच्या हाती एक-दोन रुपये टेकवायचे आणि पुढे जायचे. देवाच्या दर्शनाला येणारी एक व्यक्ती नियमित यायची आणि जाताना दहा रुपये त्या भिकाऱ्याला देऊन काही न बोलता पुढे निघून जात असे. एक दिवस ही

मानसिक हक्क Read More »

error: Content is protected !!