पाय जमिनीवर असू द्या
रामभाऊ सुपरवायझर म्हणून कंपनीत कामाला लागला. त्याचे चांगले काम बघून कंपनीने त्याला मॅनेजर पदावर प्रमोशन दिलं. मॅनेजर झाल्यानंतर रामभाऊचा अहंकार वाढला. तो लोकांशी बोलताना अरे-तुरे बोलू लागला. लोकांना दरडाऊ लागला. आपल्या अहंकाराला पुष्ट करण्यासाठी त्याने लोकांना सांभाळून न घेता लोकांवर कारवाया चालू केल्या. कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. मॅनेजर कामगार हा भेद त्याने पुष्ट केला.
पाय जमिनीवर असू द्या Read More »
