एकोपा…
राजेश व समीर आपल्या ग्रुपला घेऊन ट्रेकिंगला चालले होते. ट्रेक जंगलामधला होता. दोघेही आपापल्या ग्रुपचे टीम लिडर होते. चालता चालता राजेशला एका झाडाखाली रामफळ सापडले. भरपूर भूक लागल्यामुळे राजेश त्या रामफळावर ताव मारू लागला. रामफळ खूप गोड होते. समीरने त्याच्याकडे निम्मे रामफळ देण्याची मागणी केली. पण राजेशने त्याला हिणवले व त्याला थोडेही रामफळ दिले नाही.
