जरा जपून
प्रतिभा ही कॉन्व्हेंट मधून शिक्षण घेतलेली तरूणी. मित्रांना हस्तांदोलन करणे, सहलीला जाणे, मित्रांशी अरे-तुरे बोलणे यासारख्या मुक्त वातावरणात वाढलेली तिने हाफ स्लिव्हचा टि-शर्ट घातलेला, स्वतःचा सुंदर हसरा फोटो फेसबुकवर लोड केला. त्याला आलेल्या कमेंटस् वाचून प्रतिभाच्या पतिराजांचा पारा खूपच वर चढला. तुफान भांडणे, आरोप- प्रत्यारोप, शिवीगाळ – परिणाम आज प्रतिभा माहेरी निघून आलेली आहे.
