admim office

सत्याची ताकत

  एक राजकुमार स्वतःच्या विवाहासाठी स्वयंवर घोषित करतो. या स्वयंवरात्त राजकुमारीच्या बरोबर एक नोकरदाराची मुलगी देखील सामील झालेली असते. कारण तिला तो राजकुमार खूप आवडत असतो. राजकुमार, या स्वयंवरात प्रत्येक मुली जवळ जाऊन आपल्या जवळील पिशवीतील एक-एक बी प्रत्येकीला देतो आणि घोषणा करतो की, “तीन महिन्यांनी ज्या मुलीच्या कुंडीमध्ये या बी पासुन सुंदर रोप उगवेन.

सत्याची ताकत Read More »

मंगलमय मार्गाचा जनक

  इ.स. पूर्व ६२४ मध्ये राजा शुद्धोधन व राणी महामायेच्या पोटी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी लुम्बीनी वनात- निसर्गाच्या सान्निध्यात सिद्धार्थ गौतम बुद्धाचा जन्म झाला. या बालकामध्ये महापुरूषाची लक्षणे पाहून ऋषी असित कालदेवने भाकित केले की हा फार मोठा महापुरुष होऊन समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवेल. भाकिताप्रमाणे सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दुःखमुक्तीच्या मार्गाचा वैज्ञानिक शोध लावला व लोकांना

मंगलमय मार्गाचा जनक Read More »

अजूनही वेळ गेलेली नाही

  शुभम शिकेंच्या खुनाची बातमी वाचली, टि व्ही. सिरियलचा आधार घेवून हे कृत्य केल्याची त्या अल्पवयीन मुलांनी कबुली दिली पालक मित्रांनो सावधान! आपण स्वतःच आपल्या मुलांना संकटाच्या भयानक दरीत फेकत आहोत सावधान आज मुले अॅडमिट होत चालली आहेत. बऱ्याच घरांमध्ये आज विद्यार्थीदशेतच गुंड, मवाली, व्यसनी, व्याभिचारी, स्वार्थी, चोरटी जमात वाढत आहे याला जबाबदार कोण? पालकमित्रांनो

अजूनही वेळ गेलेली नाही Read More »

दुःख मुक्तीचं औषध मिळतं इथं !

  अपयशाने खचलेला, भविष्यातील करियरच्या चिंतेने नैराश्यात गेलेला तरुण, प्रेमभंग असह्य झाल्याने किंवा घटस्फोटामुळे आत्महत्यापर्यंतचा विचार करणारी मुले-मुली, दारुचे व्यसन सुटत नसल्यामुळे संसार रस्त्यावर यायची वेळ आलेली तरुण जोडपी, शिक्षणात अपयश, बेरोजगारी, मानसिक आजाराने त्रस्त झालेला युवा वर्ग, घरात होणाऱ्या त्रासाने घुसमटलेले स्त्री-पुरुष, न्युनगंड व भित्रा स्वभाव यामुळे आत्मविश्वास गमावलेले व जगायचं कशासाठी? या विचारांनी

दुःख मुक्तीचं औषध मिळतं इथं ! Read More »

महाराजांमुळे वाचलो

  पुण्यात सकाळी ६ ची वेळ, धुक्यामुळे पुढचं काही दिसत नव्हतं. त्यात बऱ्यापैकी अंधार, नेहमीप्रमाणे ६.०० वा. महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट बंद झाल्या. अरण्येश्वरकडून सारसबागेकडे कारने जात होतो. टेपचे बटन दाबले “तुने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी…” गाणे लागले. अंगात उत्साह संचारला व प्रसन्नचित्ताने म्युझिकवर अंग हलवत जोराने गाणे गुणगुणत मी गाडीचा स्पीड वाढविला.

महाराजांमुळे वाचलो Read More »

विद्वान सर्वत्र पुज्यते

  परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वडीलांनी बाबासाहेबांना सांगितल होते, भिमराव तु जास्त पैसे कमावले नाही तरी चालतील पण तु विद्वान हो. वडीलांचा हा उपदेश बाबासाहेबांनी कटाक्षाने अमलात आणला होता. तासन् तास बाबासाहेब वाचन करीत असत. एकदा महिनाअखेरीला त्यांनी वडीलांकडे दोन पुस्तके मागितली. ती विकत घेण्यास वडीलांकडे पुरेसे पैसे नव्हते म्हणून वडील आपल्या नुकत्याच लग्न झालेल्या

विद्वान सर्वत्र पुज्यते Read More »

उन्नत जीवनासाठी विवेकानंद वाणी

  स्वामी विवेकानंदाच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्या मार्गारेट नोबलला सापडलेला विवेकानंदाच्या डायरीत त्यांनी स्वहस्ते लिहिलेली एक टीपणी आजही युवकांना, भारतवासीयांना त्यांच्या अध्यात्मिक बलाची अनुभूती देत आहे ती पुढीलप्रमाणे: ४ जुलै १९०२ रोजी मी या जगाचा निरोप घेईन. माझे गुरु मला बोलवत आहेत. मला जे कांही कार्य करायचं आहे, ते व्यवस्थित पार पडले आहे ४ जुलै १९०२

उन्नत जीवनासाठी विवेकानंद वाणी Read More »

शहाणपण देगा देवा

गणेश मठात जायचा, तेथील गंध लावल्यामुळे पीडा दूर होते असे ज्येष्ठ साधकांकडून ऐकल्याने अॅलर्जी असून देखील तो गंध कपाळी लावायचा त्यातून त्याला त्वचारोगाला सामोरे जावे लागायचे. त्यावर वेळोवेळी औषधोपचार करणारा गणेश मात्र डॉक्टरांनी सांगून देखील गंध सोडायला तयार नव्हता. आश्रमात गुरूमंत्राची दीक्षा घेतलेली केतकी रात्रंदिवस जप करायची. यामुळे तिला नैराश्याला सामोरे जावे लागले होते. घरचे

शहाणपण देगा देवा Read More »

प्रेमाच्या गावा जावे

सागर माझा शालेय मित्र. उत्कृष्ट शरीरयष्टी, देखणा, आर्थिक सुबत्ता व प्रतिष्ठीत असलेला सागर सामाजिक कार्याच्या निमित्ताने अपंगशाळेत जायचा. तेथेच एका पायाने अपंग देखण्या मुलीच्या प्रेमात सागर पडला व तिच्याशी विवाह करून आज त्यांचा संसार सुखाने चालला आहे. सागरला नात्यातील अनेक सुंदर श्रीमंत मुली लग्नासाठी आल्या होत्या. पण सागरच्या प्रेमाची बाग त्या अपंग मुलीच्याच राज्यात फुलली

प्रेमाच्या गावा जावे Read More »

क्रोधाला आवर घालू या !

येरवडा कारागृहात विपश्यना ध्यान साधनेचे बंदिजनांसाठी आयोजित केलेल्या शिबिराचे मौन सुटले. बंदिवान एकमेकांशी बोलू लागले. ३० वर्षे वयाचा तानाजी एम.बी.ए. पर्यंत शिक्षण घेऊन एका नामांकित कारखान्यात उच्च पदावर काम करत होता पत्नी, आई-वडील, दोन लहान मुले असा सुखाचा संसार चालला होता. शेताच्या बांधावरून चुलत्याबरोबर झालेल्या भांडणात क्रोधाग्नी भडकल्यामुळे तानाजीचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने चुलत्याच्या

क्रोधाला आवर घालू या ! Read More »

error: Content is protected !!