सुखाचा पासवर्ड

स्वतःला विसरू नका

दहा मित्र प्रवासाला निघाले होते. एकत्र प्रवासात मजा येत होती. त्यांना वाटेत एक नदी लागली नदी ओलांडणार कशी? त्यांनी एक युक्ती केली एकमेकांचे हात पकडून, परस्परांचा आधार घेत घेत त्यांनी पैलतीर गाठला परंतु पैलतीरी गेल्यानंतर त्यांपैकी एकाच्या मनात शंका आली की, आपण सारेजण नदी ओलांडून आलोत का? की आपल्यापैकी कुणी नदीतून वाहून गेला? या शंकेने

स्वतःला विसरू नका Read More »

एकोपा…

राजेश व समीर आपल्या ग्रुपला घेऊन ट्रेकिंगला चालले होते. ट्रेक जंगलामधला होता. दोघेही आपापल्या ग्रुपचे टीम लिडर होते. चालता चालता राजेशला एका झाडाखाली रामफळ सापडले. भरपूर भूक लागल्यामुळे राजेश त्या रामफळावर ताव मारू लागला. रामफळ खूप गोड होते. समीरने त्याच्याकडे निम्मे रामफळ देण्याची मागणी केली. पण राजेशने त्याला हिणवले व त्याला थोडेही रामफळ दिले नाही.

एकोपा… Read More »

परिपूर्ण कोणी नसतं…

मित्रांनो, प्रत्येक माणूस हा आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो. एखाद्या उत्तम वक्त्याला आपल्या कार्यक्रमाचे उत्तम मार्केटिंग करता येईल असे नव्हे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कार्यक्रम यशस्वी करायचे असतील, तर त्या व्यक्तीने मार्केटिंग क्षेत्रातल्या तज्ञ माणसाशी पार्टनरशिप करणे आवश्यक असते. तर ती ट्रेनिंग कंपनी पुढे जाऊ शकते. एक आंधळा व एक लंगडा भिकारी एका गावात एकत्र भेटतात. गप्पा

परिपूर्ण कोणी नसतं… Read More »

लोकांना मदत करा

अचानक पहाटेच्या सुमारास बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये आजोबांच्या कण्हण्याचा आवाज आला. थोडी गडबड कानी आली. मी लगेच दार उघडून त्यांच्या घरापाशी गेलो. पाहतो तर काय, आजोबा अस्वस्थ झाले होते. त्वरित मी त्यांच्या मुलाला व कुटुंबियांना आधार देत आजोबांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना चलवायला लागलो. परंतु त्यांना चालता येत नव्हते. त्वरित मी बेडवरील एक बेडशीट घेतले. त्या बेडशीट

लोकांना मदत करा Read More »

इष्ट आपत्ती…

कोरोनामध्ये संजयची नोकरी गेली. संजय एका कारखान्यात टूल विभागात काम करत होता. त्यामुळे त्याला टूलस्क्रिप्टचे चांगले ज्ञान होते. नोकरी गेल्यानंतर आता काय करायचे? या विचाराने तो खूप अस्वस्थ झाला व नशिबाला दोष देऊ लागला काही महिन्यानंतर त्याच्या अंतर्मनाने त्याला वेगवेगळ्या कंपन्यांना टूलची गरज असते, ते सप्लाय करण्याची आयडिया दिली. त्याने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन संपर्क करून

इष्ट आपत्ती… Read More »

लोक अनुकरण करतात

समुद्राच्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीचा वेग जोरात चालू असतो. भरतीची लाट जोराने किनाऱ्यावर आदळल्यानंतर त्यात बरेचसे मासे किनाऱ्यावर आदळून पडायचे व लाट पूर्वपदावर जायची, त्यामुळे काही मासे किनाऱ्यावर पाण्याचा संपर्क तुटल्यामुळे तडफड करायला लागायचे एका मुलाने या माशांना तडफड करताना पाहून, त्यांना उचलून तो समुद्राच्या पाण्यामध्ये भिरकवून टाकू लागला. त्याचं हे कृत्य बघून अनेक जण त्याचे अनुकरण

लोक अनुकरण करतात Read More »

स्पर्धा इतरांशी नको

आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण इतरांशी आपली तुलना करत असतो. त्याने एवढं मिळवले, मला का नाही मिळवता आले. तो एवढा पुढे गेला, मी का मागे राहिलो? त्याला एवढी प्रतिष्ठा मिळाली, मला का नाही लोकं सन्मान देत ? अशा अनेक प्रश्नांनी स्वतःला त्रास करून घेत असतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती ही भिन्न आहे. प्रत्येक व्यक्तीचा मानस हा वेगळा आहे.

स्पर्धा इतरांशी नको Read More »

कृतीची जोड आवश्यक

‘रॉबिष’ कंपनीचे शेअर विक्रीसाठी फक्त दोनच दिवस उपलब्ध होते. सारंगला या कंपनीविषयी खूप चांगला अभ्यास होता. त्याला पूर्णतः माहीत होतं या कंपनीची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे शेअरला खूप चांगले मार्केट येणार आहे. म्हणून या कंपनीचे शेअर घेतले तर नक्कीच आपल्याला फायदा आहे, असा विचार त्याच्या मनात आला. परंतु तो फक्त मनापुरताच मर्यादित राहिला.

कृतीची जोड आवश्यक Read More »

एक मिस कॉल द्या

रांजणगाव भागामध्ये माझ्या ‘मनाची अमर्याद शक्ती’ या कार्यशाळेमध्ये मी श्रोत्यांना म्हणालो, ‘मित्रांनो, काही गैरसमजाने किंवा आपल्या अहंकारामुळे जर एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली असेल तर, त्या व्यक्तीला शांतपणे डोळे मिटून डोळ्यासमोर आणा व त्याच्याविषयी चांगल्या भावनेने मंगलमैत्रीचा अभ्यास करा. त्या व्यक्तीला एक मिस कॉल द्या.’ त्या गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये त्याच्या मुलाबरोबर वडिलांची थोडी कुरबुर

एक मिस कॉल द्या Read More »

सावधान

अभय, मला वेळ घेऊन ऑफिसवर भेटायला आला. आल्यानंतर मी अभयला म्हटलं, ‘बोला साहेब काय सेवा करू?’ अभयच्या डोळ्यात एकदम पाणी आले. अभय अश्रू पुसत म्हणाला, ‘सर, माझा मुलगा व्यसनाच्या विळख्यात अडकला आहे. दारू व सिगारेटच्या पूर्णतः आहारी गेला आहे. आत्तापर्यंत त्याने घरामध्ये माझे व पत्नीचे पैसे चोरले. पण अलीकडे तो बाहेर देखील चोऱ्यामाऱ्या करायला लागला

सावधान Read More »

error: Content is protected !!